रविवार, २८ मे, २०२३

दिड लाखाच्यावर नौकरभरती ...... 



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे प्रगती मैदान येथील नवीन संमेलन सभागृहात नीती आयोगाची आठवी नियामक परिषद संपन्न झाली.  या परिषदेमध्ये विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांनी हजेरी लावली होती. या परिषदेला केंद्रीय मंत्री , आयोगाचे उपाध्यक्षासह सदस्य हि उपस्थित होते. 

विकसित भारत @ २०४७ -

    विकसित  भारत @२०४७ हि संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट वचनबद्ध असल्याचे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी येथे परिषदेला नमूद केले. महाराष्ट्राने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय ध्येयाशी जोडले असून महिला सक्षमीकरण, शेतकारी, तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी महराष्ट्र शासन वचनबद्ध असल्याचेही प्रतिपादन श्री शिंदे यांनी केले. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना -

    शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरु केल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. यात अतिरिक्त निधी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि यातून १. १५ कोटी शेतकरी कुटुंबाना फायदा होणार आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्यासाठी राज्य विम्याचा हफ्ता भारत असून 'महाराष्ट्र राज्य कृषी माल निर्यात धोरण '  जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहें. 

दिड लाखाच्यावर नौकरभारती-

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यात २०२३ डिसेंबर अखेर पर्यंत दिड लाखांहून अधिक शासकीय नौकर भरती केली जाईल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली. 

धन्यवाद