सोमवार, २९ मे, २०२३

 

All image credit-Internet

महाराष्ट्र  शासनाच्या पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन ४४६ जागांसाठी भरती जाहीर २०२३.


 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन विविध ४४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून भरतीची जाहिरात पशु संवर्धन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात अली आहे. 

    शासन निर्णय , वित्त विभाग पदनि -२०२२/प्र. क. २/२०२२/आपुक ,दि ३१/१०/२०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरती वरील निर्बंध शिथिल केले आहेत. या नुसार पदभरतीला मान्यता देताना  विभाग/कार्यालयाचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अश्या विभागातील (वाहन चालक व गट ड  संवर्गातील पदे वगळून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.

 
    पशुसंवर्धन विभाकडे राज्यस्तरीय गट -  क सरळसेवा संवर्गातील विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या संवर्ग निहाय रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करावे. येथे क्लिक

-:अर्जाचे वेळापत्रक :-

 १

 ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात 

 दिनांक २७.०५. २०२३ (सकाळी १०.००पासून)

 २

 ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 

 दिनांक ११.०६. २०२३ (रात्री ११.५९ पर्यंत )

 ३

 ऑनलाईन परीक्षेचा दिनांक 

 कृपया येथे क्लिक करा. 


सविस्तर जाहिरात बघण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. 

-:पदनिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे :-

 अ . क्र 

 पदाचे नाव 

 रिक्त पदांची संख्या 

 १

पशुधन पर्यवेक्षक  

 ३७६

 २

 वरिष्ठ लिपिक 

 ४४

 ३

 लघुलेखक (उच्च श्रेणी)

 २

 ४

 लघुलेखक (निन्म श्रेणी)

 १३

 ५

 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

 ४

 ६

 तारतंत्री -३,यांत्रिकी -२, बाष्पक परिचर -२

 ७


:-परीक्षा शुक:-
अमागास :-रुपये १०००/-
मागासवर्गीय / आ. दु. घ /अनाथ/ दिव्यांग/ माजीसैनिक:- रुपये ९००/- (१०% सवलत)
बँक चार्जेस वेगळे देय असतील.  तसेच परीक्षा शुल्क ना परतावा आहे. 


कृपया अधिक माहितीसाठी श्री. विकास सोनावणे मो. क्र.  (साठी येथे क्लिक करा ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन  विभागातर्फे करण्यात आले आहे. 

रविवार, २८ मे, २०२३

दिड लाखाच्यावर नौकरभरती ...... 



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे प्रगती मैदान येथील नवीन संमेलन सभागृहात नीती आयोगाची आठवी नियामक परिषद संपन्न झाली.  या परिषदेमध्ये विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांनी हजेरी लावली होती. या परिषदेला केंद्रीय मंत्री , आयोगाचे उपाध्यक्षासह सदस्य हि उपस्थित होते. 

विकसित भारत @ २०४७ -

    विकसित  भारत @२०४७ हि संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट वचनबद्ध असल्याचे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी येथे परिषदेला नमूद केले. महाराष्ट्राने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय ध्येयाशी जोडले असून महिला सक्षमीकरण, शेतकारी, तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी महराष्ट्र शासन वचनबद्ध असल्याचेही प्रतिपादन श्री शिंदे यांनी केले. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना -

    शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरु केल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. यात अतिरिक्त निधी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि यातून १. १५ कोटी शेतकरी कुटुंबाना फायदा होणार आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्यासाठी राज्य विम्याचा हफ्ता भारत असून 'महाराष्ट्र राज्य कृषी माल निर्यात धोरण '  जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहें. 

दिड लाखाच्यावर नौकरभारती-

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यात २०२३ डिसेंबर अखेर पर्यंत दिड लाखांहून अधिक शासकीय नौकर भरती केली जाईल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली. 

धन्यवाद