शुक्रवार, ९ जून, २०२३

राज्यात आठ नवीन फळपिकांना मिळणार विमा संरक्षण. असा होणार शेतकऱ्यांना फायदा.

 राज्यात आठ नवीन फळपिकांना  मिळणार विमा संरक्षण.  असा होणार शेतकऱ्यांना फायदा. 



 राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.  यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार आणि उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे.

या योजनेअंतर्गत कमी पाऊस ,जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आद्रता, किमान तापमान या हवामान पासून होणारे धोक्यांपासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे.

या योजनेत कोण सहभी होऊ शकतात:-

ही योजना फळपिकांसाठी असून ऐच्छिक स्वरूपाची आहे योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र हे ज्या बँकेमध्ये पीक कर्ज खाते किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे पुणे 

पिक विमा साठी लागणारे कागदपत्रे:-

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळ पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग नोंदवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, 8अ उतारा, पिक लागवड घोषणापत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुक व, बँक खाते याबाबतची सविस्तर माहिती कॉमन सर्विस सेंटर मार्फत ऑनलाईन अर्ज करून भरता येईल.

अधिसूचित फळपीकांपैकी फक्त एकाच फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबे बहार पैकी कोणत्याही एका हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.


अनु.क्र

पीक / फळ 

विमा रक्कम

विमा हप्ता

अंतिम दिनांक

डाळिंब १,३०,०००/-६,५००/-१४ जुलै 
मोसंबी ८०,०००/-४,०००/-३० जून 
चिकू ६०,०००/-१३,२००/-३० जून 
संत्री,
लिंबु 
७०,०००/-
८०,०००/-
४,५००/-
६,०००/-
१४ जून 
१४ जून 
द्राक्ष ३,२०,०००/-१६,०००/-१४ जून 
सीताफळ ५५,०००/-६,३२५/-३१ जुलै 
(वरील तक्ता फक्त पुणे जिल्ह्याकरिता. कृपया आपल्या जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी  करावी.) 

वन विभागात विविध पदांसाठी मेगा भरती . एकूण पदे २४१७. अंतिम दिनांक ३० जून येथे करा अर्ज

वन विभागात विविध पदांसाठी  मेगा भरती . एकूण पदे २४१७. अंतिम दिनांक ३० जून येथे करा अर्ज 


महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील 

०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित

०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित

०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित

०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क

०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क 

०६) लेखापाल गट क 

०७) सर्वेक्षक गट क 

०८) वनरक्षक गट क 


एकूण पदे 2417 इतकी आहेत. सविस्तर पदाच्या जाहिरातीकरिता येथे क्लिक करा.


जाहिरातीत नमूद पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया Recruitment या टॅब मध्ये उपलब्ध लिंक वर अर्ज मागण्यात येत आहेत

पदांचा तपशील खालील प्रमाणे

अ.क्र.

पदनाम

जाहिरात क्रमांक 

पदांचा स्तर

भरती करिता एकूण उपलब्ध


लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद १३

लघुलेखक निम्न श्रेणी गटब अराजपत्रित

कक्ष-७/१राज्यस्तरीय पद २३

कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित

कक्ष-७/१राज्यस्तरीय पद 

रिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क कक्ष-७/१राज्यस्तरीय पद 

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क कक्ष-७/१राज्यस्तरीय पद १५

लेखापाल गट क कक्ष-१०/१राज्यस्तरीय पद १२९

सर्वेक्षक गट क कक्ष-१०/२राज्यस्तरीय पद ८६

वनरक्षक गट क कक्ष-१०/३राज्यस्तरीय पद २१३८



ऑनलाईन  अर्ज भरण्याची सुरुवात ऑनलाईन   अर्ज भरण्याची अंतिम मुदत 
दिनांक- १०/०६/२०२३दिनांक-३०/०६/२०२३

सविस्तर जाहिरात www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅब मध्ये उपलब्ध आहे.

बुधवार, ७ जून, २०२३

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा. Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.  पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.   Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana 



Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून  शेतीचे उत्पादन  अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी  चढ-उतार होत असते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात. 

 शेतकऱ्यांना अधिक मदत करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने  पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ सुरू केली आहे. 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देणे आणि त्यांचे उत्पन्न सुरक्षित करणे हा आहे.

 या योजनेला "महाराष्ट्र शेतकरी आर्थिक सहाय्य योजना" किंवा "महाराष्ट्र शेतकरी सन्मान निधी योजना" किंवा "महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान योजना" असेही म्हणतात.

 महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६,०००/-.रुपये दिले जातील.  हि रक्कम पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्याजाणार्या ६,०००/- या रकमेव्यतिरिक्त असतील. अश्याप्रकारे महाराष्रात्रातील शेतकऱ्यांना १२,०००/- प्रतिवर्षी मिळतील 

कोण असतील पात्र. 

 पीएम किसान योजनेचा लाभ घेणारा प्रत्येक शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यास आपोआप पात्र ठरतो.

कसा मिळेल लाभ?

 शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये ६,०००/- रुपये.

कुठे आणि कसा कराल अर्ज?

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी कोणताही वेगळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरला जात नाही.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरतात.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय  लागेल?

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गावच्या तलाठी कार्यालयाकडे आधार कार्ड ची आणि पासबुक ची  झेरॉक्स द्यावी लागली होती. त्यातून त्यांची नावे नोंदणी झाली होती . आता देखील तशीच कागदपत्रे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जमा करावी लागतील . 

या नागरिकांना लाभ मिळण्याची शक्यता कमी ?

 राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेतला असल्याने  या योजनेचे निकष नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेलाही लागू असतील. पीएम किसान योजना हि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये घटनात्मक पदे जसे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश, आजी-माजी लोकप्रतिनिधी शासकीय कर्मचारी करदाते, डॉक्टर इंजिनयर वकील सनदी लेखापाल वास्तुरचनाकार इत्यादींना वगळण्यात आले आहे.