गुरुवार, २५ मे, २०२३

मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

🌹श्री स्वामी समर्थ 🌹 

 मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांना मराठी विश्वकोश खंडाची प्रत भेट म्हणून देतांना. 


वाई : मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोश मूलभूत कार्य करत असून ते सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मा. राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. वाई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोश कार्यालयास मा. राज्यपाल रमेश बैस यांनी  आज सदिच्छा भेट दिली, यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उप अधिक्षक शीतल जानवे-खराडे, प्रभारी तहसीलदार वैशाली जायगुडे आदी प्रमुख उपस्थित होते.

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांचे स्वागत करतांना . 



नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक आणि उच्च शिक्षण मातृभाषेतून द्यायचे आहे. यासंदर्भात मराठी विश्वकोशाने यापूर्वीच विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयावर केलेले नोंदलेखनाचे कार्य मार्गदर्शक असल्याचे मत मा. राज्यपालांनी व्यक्त केले तसेच विश्वकोश मंडळ करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 


हे हि वाचा - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहेडाउनलोड कसे करायचे ते पहा

सुरुवातीस मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी विश्वकोश खंड भेट देऊन मा. राज्यपाल यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. शामकांत देवरे यांनी मराठी विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया सांगून विश्वकोशाच्या सर्व माध्यमांची आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. 

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांना मराठी विश्वकोशाची  माहिती देतांना 

हे हि वाचा -आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी.. 

मा. राज्यपाल यांनी विश्वकोश ग्रंथालयास भेट दिली तसेच सर्व संपादकांशी हितगुज करत कामकाज जाणून घेतले. यावेळी विद्याव्यासंगी संपादक डॉ. जगतानंद भटकर, डॉ. स्नेहा खोब्रागडे, आनंद गेडाम, सरोजकुमार मिठारी, प्रीती साळुंके, संतोष गेडाम, रवींद्र घोडराज, पल्लवी गायकवाड, शिल्पा भारस्कर, वर्षा देवरुखकर, लिपिक सचिन भाडळकर, वर्षा नाईक आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.




आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी..

🌹श्री स्वामी समर्थ 🌹 

आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी.. 


१२ वी चा निकाल जाहीर 


आज महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या उच्च शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र्र राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. राज्यात ९ विभागात कोकण विभागाने ९६. ०१ % विध्यार्थी उत्तीर्ण होऊन पहिला विभाग येण्याचा मान मिळवला आहे. 

हे हि वाचा -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे.  डाउनलोड कसे करायचे ते पहा

इतर विभागांची टक्केवारी खालील प्रमाणे आहे

                    कोल्हापूर-९३.२८%

                    अमरावती-९२.७५%

                    नागपूर-९०. ३५%

                    मुंबई-८८. १३%

                    कोंकण-९६. ०१%

                    पुणे-९३. ३४%

                    लातूर-९०. ३७%

                    नाशिक-९१. ६६%

                    औरंगाबाद -९१. ८५%

हे हि वाचा -शैक्षणिक  वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2023-24) देणाऱ्यांसाठी थोडे महत्वाचे.. वाचले नाहीतर होऊ शकते  खूप मोठे नुकसान


राज्यात एकूण १४,१६,३७१ विद्यार्थी इयत्ता १२ वी च्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी  १२,९२,४६८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले असून एकूण टक्केवारी ९१. २५% आहे. राज्यात पास झालेल्या  एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींनी ९३. ७३% मुलींनी यश मिळवत बाजी मारली तर मुलांचे प्रमाण ८९. १४% इतके आहे

हे हि वाचा - मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

१२ वी च्या (HSC) निकालाबाबत मोठी घोषणा . असा चेक कराल निकाल ..

   🌹श्री स्वामी समर्थ 🌹


१२ वी च्या निकालाबाबत मोठी घोषणा . असा चेक कराल निकाल दुपारी २ वाजता.

     महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Result 2023) निकालांकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. 12 वीचे निकाल आज , गुरुवारी (25 मे) जाहीर करण्यात येत आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिची अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही शरद गोसावी यांनी सांगितले. 

साधारण फेब्रुवारी २०२३ अखेरपासूनच बारावी आणि मार्च २०२३ पासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. ज्यानंतर आता काही दिवसांची सुट्टीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे आपल्या शैक्षणिक महत्त्वपूर्ण टप्प्याच्या या निकालांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मे २०२३ महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारावी, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुनर्मुल्यांकन आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होईल.

हे देखील वाचा:-मुंबईमध्ये घर घ्यायचंय... तेही  स्वस्तात ......  मग हि बातमी तुमच्यासाठीच .... 

कुठे आणि कसा निकाल उपलब्ध असेल ?

    विद्यार्थ्यांना सदर निकाल बोर्डाची अधिकृत संकेतस्थळ १) https://www.mahahsscboard.in तसेच २) mahresult.nic.in आणि ३) mahresults.org.in वर पाहाता  येईल.
विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पुढे बारावी (HSC) पर्याय निवडावा. पुढे हॉलतिकीट क्रमांक आणि इतर माहितीचा तपशील भरल्या नंतर काही क्षणांतच निकाल तुमच्यासमोर येईल. राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी आणि पालक या संकेतस्थळावर एकाच वेळी भेट देणार असल्यामुळे काहींना निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं तांत्रिक अडथळे उदभवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन परीक्षा मंडळाकडून देण्यात आलं आहे. एसएमएस (SMS) आणि डिजिलॉकरद्वारे (DigiLocker) देखील विद्यार्थ्यांना निकाल पाहाता येणार आहे.

या महत्वाचे संकेतस्थळं ..

www.mahresult.nic.in साठी येथे क्लिक करा 
www.hscresult.mkcl.org साठी येथे क्लिक करा 
www.mahahhscboard.in साठी येथे क्लिक करा 


ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE 12 RESULTS?)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला भेट द्या .
होम पेजवर जा आणि  महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
तुमचा बैठक क्रमांक , शाळेचा सांकेतांक  आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


कसा चेक कराल तुमचा  निकाल? (How to check Maharashtra HSC results 2023 marksheets)

स्टेप 1 - महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला बैठक क्रमांक  टाका.
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMS Text Msg द्वारे निकाल कसा पाहाल..? (HOW TO CHECK VIA SMS)
स्टेप 1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अँपवर जा.
स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.
स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला Text SMS द्वारे प्राप्त होईल.

डिजिलॉकरद्वारे कसा पाहाल निकाल? (HOW TO CHECK VIA DIGILOCKER)

स्टेप 1. DigiLocker अँप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.
स्टेप 2. आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणी केली असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.
स्टेप 3. 'MSBSHSE SSC निकाल 2023' वर क्लिक करा.
स्टेप 4. महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरील डिटेल्स द्या.
स्टेप 5. निकाल तुम्हाला प्राप्त होईल.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा . 👍

बुधवार, २४ मे, २०२३

मुंबईमध्ये घर घ्यायचंय... तेही स्वस्तात ...... मग हि बातमी तुमच्यासाठीच ....

🌹श्री स्वामी समर्थ 🌹
मुंबईमध्ये घर घ्यायचंय... तेही  स्वस्तात ......  मग हि बातमी तुमच्यासाठीच ....




        मित्रांनो , मायानगरी मुंबई मध्ये स्वतःच असं हक्काच घर असाव असं तुमचही स्वप्न असेल ना ?

तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक भन्नाट बातमी. जी वाचून तुमचं हे स्वप्न सत्यात देखील उतरू शकतं .

22 मे 2023 पासून सर्व सामान्यांना परवडणाऱ्या सदनिकांच्या विविध योजना(प्रधानमंत्री आवास आणि म्हाडा गृह निर्माण योजना )मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई यांनी  मुंबई म्हाडा गृहनिर्माण लॉटरी 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. प्राधिकरणाने 4077 फ्लॅटसाठी जाहिरात जारी केली आहे आणि त्याची नोंदणी दुपारी 03:00 वाजता सुरू होईल.

म्हाडा लॉटरी प्राधिकरणाने आपली संगणकीकृत लॉटरी प्रणाली वाढवली आहे आणि त्यात काही महत्त्वपूर्ण बदल करून त्याची 2.0 आवृत्ती (Integrated Housing Lottery Management System IHLMS-2.0) तयार केली आहे. संपूर्ण लॉटरी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि पात्र अर्जदारांसाठी सुरक्षित करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या प्रणालीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नोंदणी, पात्रता निश्चिती, दस्तऐवज सादर करणे, पेमेंट, लकी ड्रॉ, लॉटरी वितरण इत्यादींसह सर्व सहभागाचे टप्पे ऑनलाइन पार पाडले जातील. प्राधिकरणाने गुगल प्ले स्टोअरवर अर्जदारांसाठी म्हाडा हाउसिंग लॉटरी सिस्टीम नावाचे म्हाडा लॉटरी मोबाइल ऐप  देखील उपलब्ध करून दिले आहे.

म्हाडा योजनेत कुठे कुठे घरे उपलब्ध करून दिले आहेत?

 म्हाडा योजनेत जुहू ,अंधेरी,पवई,लोवर परळ,शिव मालाड, दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळीचे कन्नमवार नगर आणि बोरिवली येथील अनेक क्षेत्रांचा समावेश असेल. 

लकी ड्रॉ कुठे आणि केव्हा संपन्न होईल?

मुंबई म्हाडा लॉटरी 2023 साठी लक ड्रॉ 18 जुलै 2023 रोजी रंगशारदा, वांद्रे, पश्चिम येथे होईल.

कोणत्या गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत?

एकूण 4077 घरांपैकी 2788 घरे आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी वाटप करण्यात आली आहेत आणि 1022 घरे अल्प उत्पन्न गटासाठी वाटप करण्यात आली असून अनुक्रमे 132 घरे आणि 39 घरे मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी वाटप करण्यात आली आहेत. पात्र उमेदवार त्याच दिवसापासून नोंदणी प्रक्रियेसह पुढे जाऊ शकतात.

म्हाडा लॉटरी धारकांना म्हाडा योजनेचा फायदा कसा होतो ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

म्हाडा लॉटरी मुंबई 2023: महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रियेला पुढे जाण्यापूर्वी म्हाडा लॉटरी मुंबई 2023 च्या महत्त्वाच्या तारखा पहा.

म्हाडा लॉटरी मुंबई 2023 कार्यक्रम

तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख

22 मे 2023

अर्ज समाप्ती तारीख

22 मे 2023

पेमेंट सुरू होण्याची तारीख

26 जून 2023

पेमेंट समाप्ती तारीख

26 जून 2023

NEFT पेमेंटची शेवटची तारीख

28 जून 2023

मसुदा अर्ज यादी तारीख

04 जुलै 2023

म्हाडाची मुंबई लॉटरी यादी स्वीकारली

12 जुलै 2023

म्हाडा लॉटरी मुंबई 2023 लकी ड्रॉची तारीख

18 जुलै 2023

म्हाडा लॉटरी मुंबई 2023 लकी ड्रॉ रिफंड तारीख

19 जुलै 2023


म्हाडा लॉटरी मुंबई 2023: घर वाटप

म्हाडा लॉटरी मुंबई 2023 ने रु. 24 लाख ते रु. 7.52 कोटी किंमतीच्या 4077 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या घरांचे चटईक्षेत्र 204 चौरस फूट ते 1500 चौरस फूट दरम्यान आहे. ते वेगवेगळ्या उत्पन्न गटांमध्ये कसे विभागले गेले ते येथे आहे.

उत्पन्न गट

स्थान

वाटप केलेल्या युनिट्सची संख्या

EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) - 2788 युनिट्स

PMAY पहाडी गोरेगाव

1947 युनिट्स

कन्नमवार नगर, विक्रोळी

424 युनिट्स

अँटॉप हिल

417 युनिट्स

LIG (कमी उत्पन्न गट) - 1022 युनिट वाटप

गोरेगाव

736 युनिट्स

पत्राचल, दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), चारकोप, कन्नमवार नगर, जुने मागाठाणे (बोरिवली), विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाड

286 युनिट्स

एमआयजी (मध्यम उत्पन्न गट)

सहकार नगर (चेंबूर), दादर, कांदिवली, टिळक नगर (चेंबूर)

132 युनिट्स

HIG (उच्च उत्पन्न गट)

सायन, शिंपोली, लोअर परळ, तारदेव, तुंगा पवई.

39 युनिट्स

म्हाडा लॉटरी २०२३ बुकलेट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

म्हाडा लॉटरीचा घर खरेदीदारांना कसा फायदा होतो?

 🌹श्री स्वामी समर्थ 🌹


म्हाडा लॉटरीचा घर खरेदीदारांना कसा फायदा होतो?

म्हाडा लॉटरी 2023 चे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत :-

  • परवडणारा दर: महाराष्ट्रात परवडणाऱ्या दरात फ्लॅट मिळवा. ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेसारखीच आहे.

  • पारदर्शकता: लकी ड्रॉ (म्हाडा निकाल) पद्धतीने फ्लॅटचे वाटप केले जाते, म्हणजे प्रत्येकाला लॉटरी जिंकण्याची वाजवी संधी असते.

  • दुर्बल घटकांसाठी घर: म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत, समाजातील दुर्बल घटकांसाठीही परवडणारी घरे उपलब्ध आहेत.

  • चांगल्या ठिकाणी मालमत्ता: म्हाडा 2023 योजनेंतर्गत, सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणी फ्लॅट बांधले जात आहेत.

  • म्हाडा लॉटरी २०२३ पूर्ण माहिती साठी येथे क्लीक करा . 

सोमवार, २२ मे, २०२३

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2023-24) देणाऱ्यांसाठी थोडे महत्वाचे.. वाचले नाहीतर होऊ शकते खूप मोठे नुकसान

 


तर मित्रानो ,

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य

यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रवेश परीक्षांचे निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यांचे कडून आहेत.  
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीत राज्यभरातून अर्ज मागवण्यात आलेले होते. त्यानुसार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत जानेवारी २०२३ ते मे २०२३ पर्यंत घेण्यात आलेल्या विविध प्रवेश परिकशाचे निकाल जाहीर करण्यात आलेले असून उमेदवारांनी आपापले निकाल खालील दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन डाऊनलों करून घ्यावे. 





1MAH-B.HMCT CET 2023Technical EducationClick Here to View Score Card
2MAH-B.A./B.Sc. B.Ed. (Four Year Integrated Course)-CET 2023Higher EducationClick Here to View Score Card
3MAH-B.Ed.M.Ed. (Three Year Integrated Course)-CET 2023Higher EducationClick Here to View Score Card
4MAH-B.Planning-CET-2023Technical EducationClick Here to View Score Card
5MAH-M.Arch-CET-2023Technical EducationClick Here to View Score Card
6MAH-M.HMCT-CET-2023Technical EducationClick Here to View Score Card
7MAH-AAC-CET-2023Art EducationClick Here to View Score Card
8MAH-M.P.Ed.-CET-2023Higher EducationClick Here to View Score Card
9MAH-MCA-CET-2023Technical EducationClick Here to View Score Card
10MAH-L.L.B.5Yrs.(Five Year Integrated Course)-CETHigher EducationClick Here to View Score Card
11MAH-L.L.B.3Yrs.-CET 2023Higher EducationClick Here to View Score Card
12MAH-B.Design-CET 2023Technical EducationClick Here to View Score Card




               तर मित्रानो आपण वरील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपापले निकाल बघू शकता. 

रविवार, २१ मे, २०२३

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. डाउनलोड कसे करायचे ते पहा


 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 12 मे 2023 रोजी PCMC Admit Card 2023 जाहीर केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध संवर्गातील 386 पदांसाठी PCMC Exam Date 2023 जाहीर झाली आहे. पिपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 परीक्षा 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी होणार आहे. PCMC Admit Card 2023 जाहीर झाले असून या लेखात PCMC भरती परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे. 

खालील पदांसाठी परीक्षा घेतली जाईल 

  1. अतिरिक्त कायदा सल्लागार (Additional Legal Adviser),
  2. विधी अधिकारी (Legal Adviser),
  3. उप मुख्य अग्निशमन अधिकारी (Deputy Chief Fire Officer),
  4. विभागीय अग्निशमन अधिकारी (Divisional Fire Officer),
  5. उद्यान अधीक्षक (वृक्ष) (Park Superintendent (Trees), 
  6. सहाय्यक उद्यान अधीक्षक (Additional Park Superintendent), 
  7. उद्यान निरीक्षक (Park Inspector), 
  8. हॉर्टीकल्चर सुपरवायझर (Horticulture Supervisor),
  9. कोर्ट लिपिक (Court Clerk), 
  10. ॲनिमल किपर (Animal Keeper),
  11. समाजसेवक (Social Worker),
  12. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant),
  13. लिपिक (Clerk), आरोग्य निरीक्षक (Health Inspector),
  14. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil))
  15. आणि  कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer (Electrical)) 

      या सर्व संवर्गातील पदांसाठी 12 मे 2023 रोजी PCMC Admit Card 2023 जाहीर झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 चे प्रवेशपत्र जाहीर झाले असून आपण सर्व महत्वाच्या तारखा (PCMC Recruitment 2023 Exam Date and Other Important Dates) खालील तक्त्यात पाहू शकता. 
  
PCMC Admit Card 2023 Date and Other Important Dates Events And Date 

PCMC Recruitment 2022-23 Notification (अधिसूचना) -18 August 2022
 
Starting Date of Application (अर्ज सुरु होण्याची तारीख) -19 August 2022
 
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) -19 September 2022
 
PCMC Hall Ticket 2023 Date (प्रवेशपत्राची तारीख) -12 May 2023 

Exam Date 2023 (परीक्षेची तारीख) 26, 27 and 28 May 2023. 

तरी मित्रानो आता आपण प्रवेशपत्र कसे मिळवू शकतो ते बघूयात . 

तर मित्रानो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नौकरी मिळवू इच्छित उमेदवारांनी खालील संकेतस्थळावर भेट  देऊन आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र  मिळवू शकता. 


तर मित्रानो वरील संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या आणि यशस्वी व्हा. आमच्या शुभेच्छा.