बुधवार, ७ जून, २०२३

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा. Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.  पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.   Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana 



Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून  शेतीचे उत्पादन  अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी  चढ-उतार होत असते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात. 

 शेतकऱ्यांना अधिक मदत करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने  पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ सुरू केली आहे. 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देणे आणि त्यांचे उत्पन्न सुरक्षित करणे हा आहे.

 या योजनेला "महाराष्ट्र शेतकरी आर्थिक सहाय्य योजना" किंवा "महाराष्ट्र शेतकरी सन्मान निधी योजना" किंवा "महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान योजना" असेही म्हणतात.

 महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६,०००/-.रुपये दिले जातील.  हि रक्कम पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्याजाणार्या ६,०००/- या रकमेव्यतिरिक्त असतील. अश्याप्रकारे महाराष्रात्रातील शेतकऱ्यांना १२,०००/- प्रतिवर्षी मिळतील 

कोण असतील पात्र. 

 पीएम किसान योजनेचा लाभ घेणारा प्रत्येक शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यास आपोआप पात्र ठरतो.

कसा मिळेल लाभ?

 शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये ६,०००/- रुपये.

कुठे आणि कसा कराल अर्ज?

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी कोणताही वेगळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरला जात नाही.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरतात.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय  लागेल?

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गावच्या तलाठी कार्यालयाकडे आधार कार्ड ची आणि पासबुक ची  झेरॉक्स द्यावी लागली होती. त्यातून त्यांची नावे नोंदणी झाली होती . आता देखील तशीच कागदपत्रे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जमा करावी लागतील . 

या नागरिकांना लाभ मिळण्याची शक्यता कमी ?

 राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेतला असल्याने  या योजनेचे निकष नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेलाही लागू असतील. पीएम किसान योजना हि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये घटनात्मक पदे जसे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश, आजी-माजी लोकप्रतिनिधी शासकीय कर्मचारी करदाते, डॉक्टर इंजिनयर वकील सनदी लेखापाल वास्तुरचनाकार इत्यादींना वगळण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा