गुरुवार, २५ मे, २०२३

मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

🌹श्री स्वामी समर्थ 🌹 

 मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांना मराठी विश्वकोश खंडाची प्रत भेट म्हणून देतांना. 


वाई : मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोश मूलभूत कार्य करत असून ते सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मा. राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. वाई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोश कार्यालयास मा. राज्यपाल रमेश बैस यांनी  आज सदिच्छा भेट दिली, यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उप अधिक्षक शीतल जानवे-खराडे, प्रभारी तहसीलदार वैशाली जायगुडे आदी प्रमुख उपस्थित होते.

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांचे स्वागत करतांना . 



नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक आणि उच्च शिक्षण मातृभाषेतून द्यायचे आहे. यासंदर्भात मराठी विश्वकोशाने यापूर्वीच विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयावर केलेले नोंदलेखनाचे कार्य मार्गदर्शक असल्याचे मत मा. राज्यपालांनी व्यक्त केले तसेच विश्वकोश मंडळ करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 


हे हि वाचा - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहेडाउनलोड कसे करायचे ते पहा

सुरुवातीस मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी विश्वकोश खंड भेट देऊन मा. राज्यपाल यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. शामकांत देवरे यांनी मराठी विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया सांगून विश्वकोशाच्या सर्व माध्यमांची आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. 

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांना मराठी विश्वकोशाची  माहिती देतांना 

हे हि वाचा -आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी.. 

मा. राज्यपाल यांनी विश्वकोश ग्रंथालयास भेट दिली तसेच सर्व संपादकांशी हितगुज करत कामकाज जाणून घेतले. यावेळी विद्याव्यासंगी संपादक डॉ. जगतानंद भटकर, डॉ. स्नेहा खोब्रागडे, आनंद गेडाम, सरोजकुमार मिठारी, प्रीती साळुंके, संतोष गेडाम, रवींद्र घोडराज, पल्लवी गायकवाड, शिल्पा भारस्कर, वर्षा देवरुखकर, लिपिक सचिन भाडळकर, वर्षा नाईक आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा